आयुष्मान खुरानाच्या ड्रिमगर्लचे पहिले गाणे आज होणार रिलीज

523

आयुष्मान खुराना याचा आगामी ड्रिमगर्ल या चित्रपटाचे ट्रेलर जबरदस्त गाजले. या चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा हटके लूक पाहून त्याचे चाहते जबरदस्त खूष झाले. चाहत्यांनी त्या ट्रेलरला डोक्यावर घेतले होते. ट्रेलर नंतर आता या चित्रपटातील राधे हे गाणे बुधवारी रिलीज होणार आहे.

या चित्रपटात आयुषमान सीता, द्रौपदी, आणि राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. आज रिलीज होणाऱ्या राधे या गाण्यात आयुष्मान घागरा चोळी घालून राधे सारखा तयार झालेला दिसणार आहे. राधे या गाण्यासाठी मु्ंबईत एक मोठा सेट तयार करण्यात आला होता. या सेटला मथुरा गोकुळचा लूक दिलेला होता.

ड्रिमगर्ल या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरुचा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले असून एकता कपूर, शोभा कपूर व आशिष सिंह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हा चित्रपट 19 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या