पहिली बायको पळून गेली तर दुसरी शोध! निराश नवऱ्याला न्यायमूर्तींचा सल्ला

पहिली बायको पळून गेली तर दुसरी शोध असा सल्ला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एका तरुणाला दिला आहे. आपली पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत फरार झाल्याची तक्रार घेऊन हा तरुण उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी आला होता.

जागरण या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, नागेंद्र कुमार जयस्वाल (25) या तरुणाने 30 नोव्हेंबर 2017ला तान्या ऊर्फ मधु नावाच्या तरुणीसोबत लग्न केले. त्यानंतर ती नागेंद्रसोबत नानपूर येथे त्याच्या घरी राहत होती. काही दिवस सासरी राहिल्यानंतर तिने नवऱ्याकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे माझे पुढील शिक्षण सुरू राहील, असे सांगितले. नागेंद्रने तिची ही इच्छा पूर्ण करायचे ठरवले. त्यासाठी त्याने तिला दरभंगा येथील कालिदास सूर्य देव महाविद्यालय, त्रिमोहन येथे प्रवेश मिळवून दिला. तिथेच गर्ल्स हॉस्टेलमध्ये तिची राहण्याची सोयही केली.

त्यानंतर लॉकडाऊनंतर ती 22 एप्रिलपासून बथनाहा येथे तिच्या माहेरी काकांकडे राहायला गेली. 23 मे रोजी रात्री अचानक ती तिच्या काकांच्या घरातून कोणाला काहीही न सांगता निघून गेली. त्यावेळी तिच्या मोबाईलवर तिच्या कुटुंबीयांनी संपर्क केला असता तिचा फोनही स्विच ऑफ लागत होता.

त्या दरम्यान फक्त एवढीच माहिती मिळाली की, ती जेव्हा लग्नापूर्वी पाटणा येथे राहून शिक्षण घेत होती तेव्हा तिच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तिचा नेहमी फोन येत असे. ती त्याच्याशी गप्पा मारायची. त्या मोबाईलमधील सिममधून तो अनोळखी नंबर मिळवून तो कोणाचा आहे याचा शोध घेतला असता तो राजेश कुमार नावाच्या व्यक्तिचा आहे हे कळले.

तेव्हा नागेंद्र जयस्वालने त्याची पत्नी मधु हिला राजेश कुमारनेच पळवून नेले आहे, अशी तक्रार पटना उच्च न्यायालयाकडे केली होती. तसेच याविषयी सीतामढी येथील बथनाहा पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केला. या घटनेबाबत आरोपी राजेश कुमारनेही न्यायमूर्तींकडे तक्रार दाखल केली.

जेव्हा दोन्ही पक्ष न्यायालयात एकमेकांसमोर आले. त्यावेळी न्यायमूर्तींनी नागेशला, पहिली बायको परपुरुषासोबत निघून गेली तर तिला विसर आणि दुसरीचा शोध घे, असा अजब सल्ला दिला. तसंच राजेश याच्याविरुद्ध कारवाई न करता त्याला जामीनही देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या