मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसानभरपाई द्या! शिवसेनेची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

741

क्यार आणि महाचक्रीवादळामुळे तसेच अतिवृष्टीमुळे मच्छीमारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मच्छीमारांचा 90 दिवसांचा हंगाम वाया गेला असून मच्छीमारांचे प्रचंड आर्थिक नुकसान झालेले आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमार बांधवांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

सतत 3 महिने मासेमारीसाठी गेलेल्या नौका प्रशासनाने परत बोलावल्यामुळे प्रत्येक फेरीचे बर्फ, डिझेल आणि खलाशी मेहनताना वाया गेल्यामुळे मोठय़ा प्रमाणात आर्थिक भुर्दंड मच्छीमारांना सोसावा लागला आहे. या सर्व मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्याकडे केली आहे. तत्काळ पंचनामे करून शासनाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी शिवसेना विधानसभा संघटक यशोधर फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेटये उपस्थित होते. मुंबई शहर आणि उपनगरात अंदाजे 34 पारंपरिक कोळीवाडे आहेत. या कोळीवाडय़ांमध्ये मच्छीमारीसह मच्छी सुकवण्याचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात केला जातो. 1 ऑगस्ट 2019 पासून मासेमारीचा हंगाम सरू झाला, परंतु अतिवृष्टीमुळे वाळत घातलेली आर्थिक नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर या मच्छीमार बांधवांनाही नुकसानभरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या