३६ इंचाची कंबर २४ इंच करण्यासाठी…

521

सामना ऑनलाईन । मुंबई

रोजच्या धावपळीत जिम, योगा बरोबरच डाएट करायलाही वेळ मिळत नसल्याने तरुणांमध्ये स्थुलतेचे प्रमाण वाढत आहे. त्यातही तरुणींमध्ये पोट व कंबरेचा घेर वाढण्याच प्रमाण जास्त आहे. यावर वेळीच उपाय न केल्यास भविष्यात अनेक शारीरिक व्याधी जडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी काही टिप्स..

  • रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा रस व एक चमचा मध टाकून ते पाणी प्यावे. पोटावरची चरबी कमी होते.
  • एक कप  पाण्यात अर्धा चमचा बडिशेप टाकून ते  उकळून घ्यावे. पाणी थंड झाल्यावर हा अर्क गाळून प्यावा. यामुळेही वजन कमी होते.
  • चहात पुदीना टाकून प्यावा. तसेच आहारात पुदीन्याच्या चटणीचा समावेश करावा.
  • फळांमध्ये व हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरिजच प्रमाण कमी असल्याने त्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा.
  • चिकू व केळयामुळे वजन वाढते. यामुळे ते न खाल्लेलेच बरे.
  • पपई खाल्यामुळेही चरबी कमी होते. कच्च्या पपईचा रस प्यावा.
  • साखर, बटाटा, व तांदळात कार्बैाहायड्रेटचे प्रमाण अधिक असते यामुळे त्याचे सेवन प्रमाणात करावे.
  • गव्हाऐवजी सोयाबीनआणि चन्याच्या पिठाच्या चपात्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहेत.
  • हल्ली बाजारात मिश्र डाळी व कडधान्यांचे पीठ मिळते. त्यापासून पैौष्टीक चपात्या बनवता येतात.
  • चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक्स ऐवजी फळांचा रस, दूध घ्यावे.
आपली प्रतिक्रिया द्या