पाच बजेट स्पोर्ट बाईक्स, किंमत खिशाला परवडणारी अन फीचर्सही दमदार

हिंदुस्थानमध्ये स्पोर्ट बाईकची मागणी सातत्याने वाढत आहे. भरधाव वेगात बाईक चालवण्यासाठी तरुणाई उत्सुक असते. एकेकाळी विदेशातून आयात होणारी स्पोर्ट बाईक आता आपल्या देशातही तयार होत आहे. मात्र स्पोर्ट बाईक म्हटले की बजेटची समस्या येतेच. कारण या बाईक साधारण बाईकच्या तुलनेत महाग असतात. मात्र त्यातल्या त्यात खिशाला परवडतील अशा काही बाईक्सबाबत जाणून घेऊया…

TVS Apache RTR 200 4V

images-3
या गाडीत 197.75 सीसीकॅगे 4 स्ट्रोक इंजिन असून 5 स्पीड ट्रान्समिशनसह ही बाईक येते. तसेच रेस ट्यून्ड-फ्यूल इंजेक्शन ‘RT-Fi’ टेक्नोलॉजीसह ही बाईक येते आणि ब्लु टूथ सोबत ‘फेदर टच’ स्टार्ट, क्लॉ स्टाइल पोजिशन लॅम्प व LED हेडलॅम्प सारखेे फीचर्स देण्यातबाले आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 25 हजार आहे.

Suzuki Gixxer 150 SF

images-4
BS 6 चे 155 सीसी 4 स्ट्रोक इंजिन, सिंगल-सिलेंडर, एयर-कूल्ड, FI, SOHC इंजन देण्यात आले आहे. बाईकला 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स देण्यात आला आहे. तसेच 12 लिटरची फ्युल टाकी देण्यात आली असून याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 11 हजार रुपये आहे.

Bajaj Pulsar RS 200

images-5
बाईक 199.5 सीसी लिक्विड कूल, फ्यूल इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहे. तसेच 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह ट्विन प्रोजेक्टर हेडलैंप्स, LED डेटाइम रनिंग लाइट्स, LED टेललाइट आणि एक सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल देण्यात आले आहे. याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 49 हजार रुपये आहे.

KTM RC 125 आणि 125 Duke

images-6
दोन्ही बाईकला 125 सीसी 4-वाल्व, लिक्विड कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. 125 ड्यूकची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 42 हजार रुपये आणि आरसी 125 ची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे.

Yamaha R15

images-7
या बाईकला 155 सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे. ही बाईक 6-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. सोबत ऑल एलईडी लॅम्प, ऑल डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जर, स्लिपर क्लच आणि ड्युअल चॅनेल एबीएस सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 48 हजार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या