महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. हे प्रकरण सध्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर आहे. ते सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे द्यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मागील सुनावणीत केली होती. मंगळवारी म्हणजे आज झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे होईल अथवा नाही याबाबत निर्णय झाला नाही.

महिन्याभरानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणार असल्याने आज कोर्टात काय होतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष्य लागलं होतं. सर्वोच्च न्यायालयाच्या मंगळवार, 10 जानेवारीच्या कामकाजात सकाळी साडेदहा वाजता  याप्रकरणावर सुनावणी होणार झाली. 14 फेब्रुवारीपासून या प्रकरणावर नियमितपणे सुनावणी सुरू होईल असे सांगितले जात आहे.