नेपाळमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या पाच रशियन गिर्यारोहकांचा धवलगिरी शिखरावरून पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हे सर्वजण रविवारपासून बेपत्ता होते. बचाव हेलिकॉप्टरद्वारे बेपत्ता गिर्यारोहकांचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी पाचही जणांचे मृतदेह सापडल्याचे नेपाळमधील मोहीम संयोजकाने सांगितले.
गेल्या महिन्यापासून शरद ऋतूतील गिर्यारोहण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेअंतर्गत रशियन गिर्यारोहक जगातील सातव्या सर्वात उंच 26,788 फूट धवलगिरी शिखरावर गिर्यारोहणासाठी गेले होते.
मोहिमेत सहभागी असलेल्यांपैकी दोन गिर्यारोहक शिखरावर पोहचले. बाकीचे मोहीम थांबवून मागे परतले. तेव्हापासून बेस कॅम्पचा आणि त्यांचा संपर्क तुटला होता. हे गिर्यारोहक बेपत्ता असल्याची माहिती मिळताच हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध सुरू होता. अखेर मंगळवारी शोधमोहिमेला यश आल्याचे काठमांडूस्थित I AM ट्रेकिंग अँड एक्स्पिडिशन्सचे पेम्बा जंगबू शेर्पा यांनी सांगितले.