९ मार्च रोजी पाच राज्यांतील एक्झीट पोल

30

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांचा एक्झीट पोल (मतदानोत्तर निकाल) येत्या ९ मार्च रोजी सायंकाळी ५.३०नंतर घोषित करण्यास माध्यमांना निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे.

पंजाब, गोवा, उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान झालेले आहे. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमधील अखेरच्या टप्प्यातील मतदान ८ मार्च रोजी आहे. पण उत्तर प्रदेशात अलापूर, उत्तराखंडमध्ये कामप्रयाग येथील उमेदवारांचे निधन झाल्याने येथील लांबणीवर टाकलेले मतदान ९ मार्च रोजी होणार आहे. यामुळे आयोगाने ९ मार्च रोजी त्याच दिवशी सायंकाळी ५.३०नंतर एक्झीट पोल घोषित करण्यास माध्यमांना परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या