तबलिगींना पकडण्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस

1242

तबलिगी समाजाच्या कार्यक्रमात जे कोणी सामील झाले होते त्यांनी समोर यावे असे आवाहन सरकारने केले आहे. असे असले तरी अनेक तबलिगी लपून बसले आहे. उत्तर प्रदेशच्या आजमगढमध्ये तबलिगींना पकडण्यासाठी पाच हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. आझमगढ जिल्ह्यात आतापर्यंत 35 तबलिगींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेले अनेक लोक आजमगढमध्ये आले आहेत. जमातमधील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे तमातच्या कार्यक्रमात जे लोक सामील झाले होते त्यांनी चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केलेहोते. जे लोक स्वतःहून बाहेर येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलिसांनी जाहीर केले होते. असे असले तरी अनेक तबलिगी समोर येत नाहीत. त्यामुळे जो कोणी तबलिगींची माहिती देईल त्याला पाच हजारांचे बक्षीस देण्यात येईल असे पोलिसांनी जाहीर केले आहे.

आजमगढ जिल्ह्यातील एका मशिदीतून 16 कोरोना संशयित रुग्णांना पकडण्यात आलेहोते. सर्व संशयित जमातशी संबंधित होते. त्यात तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि गाझियाबादचे तीन रहिवसाची कोरोना पॉझिटिव्ह मिळाले होते. त्यांच्या संपर्कात आल्यामुळे मुबारकपूरमधील एका मौलानालाही कोरोनाची लागण झाली होती. सर्व संशयित 21 मार्चपासून मशिदीत लपले होते.

आपली प्रतिक्रिया द्या