वीजेच्या शेतकुंपणामुळे ५ वन्यप्राण्यांचा मृत्यू

16

सामना ऑनलाईन, अमरावती

पिकांचं प्राण्यांपासून आणि घुसखोरांपासून संरक्षण करण्यासाठी एका शेतकऱ्याने वीजेच्या शेताभोवती तारेचं कुंपण घातलं होतं. या कुंपणाला स्पर्श झाल्याने ५ प्राण्यांना वीजेचा जबर धक्का बसला. या धक्क्यामुळे या पाचही प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. अमरावती शहराशेजारील कठोरा मार्गावरील नवसारी परिसरातील ही घटना आहे.

वीजेच्या धक्क्याने ज्या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये २ रोही प्राणी, दोन काळवीटं आणि एका रानडुकराचा समावेश आहे. ही शेती संजय महल्ले यांच्या नावावर असून त्यांनी प्राण्यांपासून शेतीचं संरक्षण करण्यासाठी कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडला होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि नंतर हे प्राणी शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. वनविभागाने संजय महल्ले यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या