बोईसर अल्पवयीन मुलीच्या बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल

पालघर मधील बोईसर येथे एका पाच वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बोईसर परिसरातील एका पाच वर्षीय चिमुकलीवर बारा वर्षीय अल्पवयीन आरोपीने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

पीडित चिमुकलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर बोइसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येणार आहे. तर पीडित चिमुकलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या