नाट्य परिषद निवडणुकीत ‘आपलं पॅनेल’; प्रसाद कांबळी, सुकन्या मोने, मंगेश कदम निवडणूक रिंगणात

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या 16 एप्रिल रोजी होणार आहे.   निवडणुकीत प्रसाद कांबळी, सुकन्या कुलकर्णी- मोने, मंगेश कदम अशा 14 उमेदवारांचे ‘आपलं पॅनेल’ उभे राहिले आहे.  गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘आपलं पॅनेल’ची  घोषणा करण्यात आली.

‘आपलं पॅनेल’ हे सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणारे पॅनेल आहे. यामध्ये लेखक, कलाकार, दिग्दर्शक, रंगमंच कामगार अशा सगळ्या घटकांना सामावून घेण्यात आले आहे. घटक संस्थांचे हित, रंगमंच कामगारांचे संरक्षण असे विषय घेऊन निवडणूक लढवत असल्याचे  प्रसाद कांबळी यांनी सांगितले. मागील  आठवडय़ात प्रशांत दामले, अजित भुरे, सयाजी शिंदे,  विजय पेंकरे आदींच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनेलची घोषणा झाली आहे. आपलं पॅनेल आणि रंगकर्मी नाटक समूह पॅनेलमध्ये निवडणूक रंगत पहावयास मिळेल.

 आपलं पॅनेलचे उमेदवार

  •  मध्यवर्ती शाखा उमेदवारनवनाथ कांबळी, सुकन्या कुलकर्णी मोने, मंगेश कदम, राजन भिसे, प्रमोद पवार, संतोष काणेकर, रत्नकांत जगताप, सुनील देवळेकर, अनिल कदम, प्रभाकर वारसे
  • मुंबई उपनगर शाखा दिगंबर प्रभू, अविनाश नारकर, अशोक नारकर, ऐश्वर्या नारकर