इसिसशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच तरुणांना अटक

28

सामना ऑनलाईन । तिरुअनंतपुरम

इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच तरुणांना केरळमधून स्थानिक पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. केरळच्या कन्नूर भागामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसशी संबंध असणारे हिंदुस्थानी तरुण परदेशातून केरळमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत पाच जणांना ताब्यात घेतले. अटक केलेले तरुण केरळमधील वेलापट्टणम आणि चक्करकल या भागातील रहिवासी आहेत.कन्नूरचे पोलीस उपअधीक्षक पी. पी. सदानंदन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या