सरकारी आदेशाचे मदरशांकडून पालन

29

सामना ऑनलाईन, लखनौ

स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करून राष्ट्रगीत म्हणण्याचे आणि त्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्याचे उत्तर प्रदेश सरकारने मदरशांना आदेश दिले होते. या आदेशाचे पालन बहुसंख्य मदरशांकडून झालेले आहे. मात्र काही मदरशांनी हे आदेश धुडकावल्याची माहितीही समोर आली आहे.

सरकारने काढलेल्या या आदेशाचे बरेलीच्या बरेलव्ही मदरशाने उघडपणे उल्लंघन केले आहे. राज्यातील सर्व इस्लामिक शैक्षणिक संस्था, मुस्लिम स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करून राष्ट्रगीत गायनाची सक्ती योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने एका आदेशानुसार केली होती. या आदेशाचे अल्पसंख्याक मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी समर्थन केले आहे. स्वातंत्र्यदिन साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे, असे ते म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या