ऍमेझॉन पेक्षा फ्लिपकार्ट ‘भारी’, फ़ेस्टिवल सीजनमध्ये हजारो कोटींचा व्यवसाय

यंदाच्या फेस्टिवल सीजनमध्ये फ्लिपकार्टने बाजी मारत ऍमेझॉन पेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. कोरोना काळातही लोकांनी भरपूर शॉपिंग केली आहे. इ कॉमर्स कंपन्यांनी अवघ्या एका आठवड्यात 30 हजार कोटींचा व्यवसाय केला आहे. बहुतांश ग्राहकांचा कल हा स्मार्टफोनकडेच होता.

दोन्ही कंपन्यांचा व्यवसाय 90 टक्के

दोन्ही कंपन्यांचा मिळून 90 टक्के व्यवसाय झाला आहे. त्यात फ्लिपकार्टने बाजी मारत 68 टक्के व्यवसाय केला आहे. तर ऍमेझॉनने 32 टक्के व्यवसाय केला आहे. 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान विशेष सेलचे आयोजन करण्यात आला होता. कोरोना काळातही ग्राहकांनी त्यावर उड्या मारल्या.

30 हजार कोटींचा व्यवसाय

एका कन्सल्टिंग कंपनीने दिलेल्या माहितीनुसार फेस्टिवल सीजनमध्ये 55 टक्क्यांनी विक्री वाढली आहे. यंदा 30 हजार कोटींच्या वस्तू विकल्या गेल्या आहेत. त्यात प्रामुख्याने स्मार्टफोन जास्त संख्येने विकले गेले आहेत.

ग्रामीण भागतही वाढले ग्राहक

प्रत्येक विभागातील वस्तू विकल्या गेल्या आहेत. फक्त शहरीच नव्हे तर निमशहरी, ग्रामीण भागातही ऑनलाईन वस्तू मागण्याचा कल वाढत आहे.

प्रत्येक मिनिटाला 1.5 कोटीचे स्मार्टफोन

ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 47 टक्के मोबाईल विकले गेले आहेत प्रत्येक मिनिटाला तब्बल 1.5 कोटी रुपयांचे मोबाईल विकले गेल आहेत. त्यानंतर 28 टक्के इलेक्ट्रॉनिक्स, 14 टक्के फॅशन संबंधित वस्तू विकल्या गेल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या