फ्लिपकार्टने त्यांच्या धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. या धमाकेदार सेलचा टीझर नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना एक्सचेंज ऑफरसह विविध ऑफर देण्यात येत आहे. त्यामुळे स्मार्टफओनसह इलेक्ट्रॉनिक आणि इतर वस्तू खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. फ्लिपकार्टचा हा 10 वा Big Billion Days Sale आहे. या सेलच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाही. मात्र, या सेलबाबतच्या विविध ऑफर 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान जाहीर करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सेलबाबतची ग्राहकांची उत्कंठा वाढली आहे.
या सेलमध्ये स्मार्टफोनसह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर उत्पादनांवरही बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. तसेच नो कॉस्ट ईएमआय ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि इतर अनेक सुविधा मिळणार आहेत. या सेलमध्ये ग्राहक सुपरकॉन्सचाही वापर करू शकणार आहेत. फ्लिपकार्टने 6 नव्या स्मार्टफोनला हायलाईट केले आहे. त्यामुळे या धमाकेदार सेलमध्ये ते फोनही डिस्काउंटसह विक्रीला असण्याची शक्यता आहे.
या सेलमध्ये विवो, सॅमसंग, पिक्सेल आणि इतर ब्रँडचे स्मार्टफोनही असतील. त्यामुळे स्मार्टफोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी डिस्काउंटमध्ये फोन घेण्याची चांगली संधी आहे. मात्र, या सेलसाठी ग्राहकांना थोडी वाट बघावी लागणार आहे. संपनीने सर्व ऑफर जाहीर करण्याच्या तारखा दिल्या आहेत. सेलबाबतच्या विविध ऑफर 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरदरम्यान जाहीर करण्यात येणार आहेत.
विवो स्मार्टफोनवरील ऑफर 29 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहेत. तर Infinix वरील ऑफर 30 सप्टेंबरला जाहीर होणार आहेत. नथिंग फोनवरील ऑफर 2 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. सॅमसंग फोनवरील ऑफर 3 ऑक्टोबर तर Poco च्या ऑफर 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहेत. 5 ऑक्टोबरला पिक्सेल, 6 ऑक्टोबरला Realme, 7ऑक्टोबरला Xiaomi आणि 8 ऑक्टोबरला OPPO वरील ऑफर जाहीर होणार आहेत. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना या सेलचा फायदा होणार आहे. त्यांना डिस्काउंटसह विविध ऑफरही मिळणार आहेत.