आसाम, मेघालयमध्ये पूर; 70 हजार नागरिक विस्थापित

गेल्या दोन दिवसांत आसाम आणि मेघालयमध्ये मुसळाधर पाऊस झाला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात पूर आला आहे. या पुरामुळे आतापर्यंत 70 हजार नागरिक विस्थापित झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुराचा सर्वाधिक फटका आसामला बसला असून पाच जिल्ह्यातील 60 हजार नागरिक विस्थापित झाले आहेत. तसेच पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागाव आणि पश्चिप कर्बी अंगलोग जिल्ह्यातील 40 हजार नागरिका विस्थापित झाले असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.  पुरामुळे 3 हजार 973 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. या पुरामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक पुल उध्वस्त झालेत आहेत.

या वर्षीच्या पुरात आसाममधील 30 जिल्ह्यातील 57 लाख लोक विस्थापित झाले असून 117 जणांचा जीव गेल आहे.  गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी भुस्खलन झाले आहे.  गेल्या 72 तासात मेघालयमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मेघालयमध्ये पूर आणि भुस्खलनामुळे 10 हजारहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या