15 एकर शेती पुरात वाहून गेली, चंद्रपुरात शेतकऱ्याने केली आत्महत्या

1102

पुराच्या पाण्यानं शेतातील पीक नष्ट झाल्यानं प्रदीप पत्रू सातपुते (48) या शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. गोंडपिंपरी तालुक्यातील घडोली येथील हे शेतकरी असून, त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे. प्रदीप यांच्याकडे 15 एकर शेती होती. गेली दोन वर्ष पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतातून काहीच उत्पन्न आलं नव्हतं. शेती कामासाठी प्रदीप यांनी 15 लाख रुपयांचे कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड न केल्याने प्रदीप यांचा ट्रॅक्टर कंपनीने जप्त केला होता. यावर्षी चांगला पाऊस होईल आणि शेतात चांगलं पीक येईल असी प्रदीप यांना आशा होती. मात्र यावर्षी दुष्काळाऐवजी अतिवृष्टी झाली आणि प्रदीप यांची शेतीच वाहून गेली. अतिपावसामुळे प्रदीप यांनी लावलेल्या सोयाबीन आणि कापसाची पिके पूर्णपणे उध्वस्त झाली. यामुळे पुरत्या खचलेल्या प्रदीप यांनी आत्महत्या केली.

आपली प्रतिक्रिया द्या