त्र्यंबकेश्वर, इगतपुरीत पूर

20


सामना ऑनलाईन । नाशिक

गेल्या चोवीस तासांत इगतपुरीत 172 मिलिमीटर, तर त्र्यंबकेश्वरला 127 मिलिमीटर पाऊस झाला. काल दुपारपर्यंत या दोन तालुक्यांत मुसळधार पाऊस सुरूच असल्याने परिसर जलमय होऊन जनजीवन प्रभावित झाले होते. जिह्यात इतरत्र मात्र हलक्या सरींनीच हजेरी लावली.

इगतपुरी तालुक्याला बुधवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. धारगाव मंडळ व परिसरात ढगफुटीसारखी परिस्थिती उद्भवली होती. या तालुक्यात बुधवारी सकाळी आठ ते गुरुवारी सकाळी आठ या चोवीस तासांत तब्बल 172 मिलिमीटर पाऊस झाला. येथे दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर हलक्या सरी बरसत होत्या.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातही मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले होते. दिवसभर अधूनमधून मध्यम ते हलक्या सरी बरसत होत्या. येथे चोवीस तासांत 127 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर दिवसभरात दहा तासांत आणखी 145 मिमी पाऊस पडला.

सिंधुदुर्गला झोडपले

सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने सिंधुदुर्ग जिह्याला झोडपून काढले. मुसळधार पाऊस पडत असल्याने सर्वत्र पुराचे पाणी होते. काही ठिकाणी पुलावरून पाणी गेल्याने तेथील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जिह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या चोवीस तासांत जिह्यात 73.62 च्या सरासरीने 589 मिमी तर आतापर्यंत 1275.08 च्या सरासरीने 10200.64 मिमी पाऊस पडला आहे.  वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक 129 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या