बीडमध्ये ताप सर्दी खोकल्याची साथ,  हजारो रुग्ण इस्पितळात दाखल

15

सामना प्रतिनिधी । बीड

बीड शहरासह जिल्ह्यात सर्दी, ताप खोकल्याच्या साथीने थैमान घातले आहे, शासकीय आणि खाजगी रुग्णालये खचाखच भरली आहेत. स्वाइन फ्लू सारखी लक्षणे असल्याने आरोग्य प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे आहे, खबरदारीचे उपाय म्हणून स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक औषध पुरवणे गरजेचे आहे.

गेल्या आठवडाभरापासून बीड शहरासह जिल्हाभरात ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, रुग्णाच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे.  बीडच्या जिल्हारुग्णालयापासून  ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि खाजगी रुग्णालयात एक हाजारापेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.  सर्दी, ताप, खोकला हा नियमित आजार वाटत असला तरी काही अंशी स्वाईन फ्लू सारखी लक्षणे आढळून येत आहेत. आरोग्य प्रशासनाने या दृष्टी ने अद्याप पाऊले उचलले नाहीत, रुग्णाची तपासणी आणी स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक औषध सुरू करणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या