आली उडणारी कार

45

पोर्तुगालच्या एका स्टार्ट-अप कंपनीने आजवर फक्त सायन्स फिक्शन चित्रपटात दिसणारी उडणारी कार प्रत्यक्ष बनवण्यात यश मिळवले आहे. हवाई वाहतूक आणि रस्ते वाहतूक दोन्हींच्या नियमाचे पालन करून ही कार बनवण्यात आली आहे. ही चालवण्यासाठी पायलट लायसन्सची आवश्यकता असून कमीत कमी २५ तास उड्डाणाचा अनुभव देखील गरजेचा आहे. १०० अश्वशक्तीची दोन इंजिने असलेल्या या कारला विमानासारखी तीन चाके देण्यात आलेली आहेत. कारच्या वरती हेलिकॉप्टरप्रमाणेच दोन पात्यांचा पंखा असून तो कारला हवेत उडण्यासाठी मदत करणार आहे. या कारला मागच्या बाजूला प्रोपेलर लावण्यात आले आहेत, जे हवेत कारला वेग देण्याचे काम करतील. रस्त्यावर १६० किमी प्रतितास आणि हवेत १७७ किलोमीटर प्रतितास असा या कारचा वेग असेल. जमिनीवरून हवेत उड्डाण करायला ही कार १० मिनिटांचा अवधी घेते. हिचे बेसिक मॉडेल ४ लाख डॉलर्स (अंदाजे २.५० कोटी रुपये) आहे. या कारमध्ये पायलटबरोबरच अजून दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.

आपली प्रतिक्रिया द्या