‘गाढवाचं लग्नं’मधील ‘गंगी’ काळाच्या पडद्याआड

लोककलावंत प्रभा शिवणेकर (81) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 1950-80च्या दशकात ‘गाढवाचं लग्न’ या मूळ वगनाटय़ात त्यांनी साकारलेली गंगीची भूमिका अजरामर झाली. मुळशी तालुक्यात त्यांच्या मूळगावी प्रभा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘गाढवाचं लग्नं’ या वगनाटय़ाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. नाटकाच्या प्रयोगांसाठी दादू इंदुरीकरांचे जेवढे कौतुक व्हायचे तितकेच कौतुक प्रभा शिवणेकर यांचे व्हायचे. या भूमिकेसाठी प्रभा शिवणेकर यांना संगीत नाटय़ अकादमीने 1974 साली तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव केला होता.