सुशांतला सलमान खान कंपूकडून येत होत्या धमक्या, गायकाचा खळबळजनक दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. त्याच्या मृत्युसंबंधीही रोज नवनवीन दावे केले जात आहेत. या दरम्यान एका गायकाने सलमान कंपूकडून सुशांतला धमक्या मिळत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

हेही वाचा- ‘Being Human’ संस्थेत चॅरिटीच्या नावाखाली मनी लॉन्ड्रिंगचा धंदा, दिग्दर्शकाचा सलमान खानवर गंभीर आरोप

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुनील छैला बिहारी असं या गायकाचं नाव असून त्याने सलमान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रदर्शित केला असून त्याच्या म्हणण्याप्रमाणे सुशांतला गेल्या महिन्याभरापासून धमक्या मिळत होत्या. या धमक्या सलमान खान याच्या कंपूकडून मिळत होत्या, असा आरोप त्याने केला आहे.

sunil-chhaila-bihari

हेही वाचा- दिवंगत अभिनेत्याच्या पत्नीने केली शाहरुख आणि करण जोहरची पोलखोल, सांगितला ‘तो’ किस्सा

सतत धमक्या मिळत असल्याने त्याने जवळपास 50 सिमकार्ड बदलली होती. नवीन नंबर घेतल्यानंतरही त्याला धमक्या मिळणं बंद झालं नाही. सुशांत याचा मित्र संदीप सिंह हाच दरवेळी बदललेला नंबर सलमान खान कंपूला सांगत असायचा. त्यानंतर सलमान खान हा आपल्या गुंडांकरवी सुशांतला धमकावत होता, असा गंभीर आरोप बिहारी याने केला आहे. सुशांतच्या मृत्युची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीही बिहारी याने केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या