आकाशसाठी अमिताभ बनले डिलिव्हरी बॉय

फूड डिलिव्हरी करणारा पुण्यातील आकाश वाघमारे नुकताच तो ‘केबीसी’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. यात त्याला अपेक्षित रक्कम जिंकता आली नसली तरी अमिताभ बच्चन यांच्याकडूनच त्याला मोठे गिफ्ट मिळाली आहे. हे गिफ्ट म्हणजे चक्क बिग बी त्याच्यासाठी डिलिव्हरी बॉय बनले. याबाबत आकाश म्हणाला, काम करताना मलाही भूक लागते. इच्छा असूनही फूड डिलिव्हरीचे काम थांबवता येत नाही. आपल्यासाठीदेखील कोणीतरी पार्सल मागवावे असे मला कधीकधी वाटते. हीच बाब बच्चन सरांना समजली. त्यामुळे त्यांनी मला विचारले होते की, तुला काय खायला आवडते. तर मी त्यांना बिर्याणी आवडत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी शो सुरू असताना स्वतः माझ्यासाठी बिर्याणी मागवली. तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च आनंद देणारा क्षण होता.

आपली प्रतिक्रिया द्या