योग्य प्रमाणात तामसीक आहार घेतल्यास होतो कोरोनापासून बचाव

3418

आयुर्वेदानुसार आहाराचे सात्विक, राजसीक आणि तामसीक असे तीन प्रकार आहेत. आयुर्वेदाने प्रत्येकाला तामसीक आहार टाळणे किंवा तो कमी प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला आहे. तामसीक आहाराला उग्र गंध असतो. तसेच त्याच्या अतिसेवनाने शरीरात आजार बळावण्याची शक्यता असते. म्हणून या आहाराचा समावेश आयुर्वेदाने तामसीक आहारात केला आहे. तसेच सात्विक आहाराने मन शांत होते. तसेच राजसीक आहाराने इच्छा वाढतात, त्यामुळे त्याला या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. तामसीक आहाराने शरीरात काही दोष वाढत असले, तरी योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्याने कोरोनापासून बचाव होऊ शकतो, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

मशरुम, लसूण, कांदा, मटन आणि मद्य यांचा समावेश तामसीक आहारात होतो. या सर्वांना उग्र वास असून त्याच्या अतिसेवनाने शरीरात दोष निर्माण होतात. यातील मटन आणि मद्य यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याने हे पदार्थ टाळणे हिताचे आहे. तर मशरुम, लसूण आणि कांदा यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास कोरोना आणि इतर साथीच्या रोगापासून बचाव होण्यास मदत होते. मशरुममध्ये विटामिन डी जास्त प्रमाणात असते. शरीरातील विटामीन डी ची गरज मशरुमच्या सेवनाने सहज पूर्ण होऊ शकते. मात्र, मशरुम पचण्यास थोडे जड असते, याची काळजी घेत त्याचे योग्य प्रमाणात सेवन करावे. तसेच नेहमी दुपारच्या जेवणात याचा समावेश करावा किंवा झोपण्यापूर्वी चार तास आधी याचे सेवन करावे.

कांदा आणि लसूण यांना उग्र वास असतो. त्यामुळे अनेकजण याचे सेवन टाळतात. मात्र, या दोन्ही गोष्टीत अँटीफंगल आणि अँटीवायरल गुण असल्याने कोरोना आणि साथीच्या रोगाचे संक्रमण टाळण्यासाठी याचा उपयोग होतो. या दोन्ही गोष्टींचा आहारात योग्य प्रमाणात समावेश केल्यास शरीरात फंगल, वायरस आणि बॅक्टरियापासून होणाऱ्या रोगांपासून बचाव होतो. हे दोन्ही पदार्थ कच्चे किंवा जेवणातील एखाद्या पदार्थात वापरता येतात. मात्र, आहारात याचे प्रमाण मर्यादीत असावे. या पदार्थात असणाऱ्या गुणधर्मामुळे कोरोना विषाणू आणि पावसाळ्यात पसरणाऱ्या संसर्गजन्यआजारापासून शरीराचा बचाव होण्यास मदत होते.

आपली प्रतिक्रिया द्या