मुंबई फुटबॉल एरेनात रंगणार स्वीडन, थायलंडविरुद्धच्या फुटबॉल लढती

241

हिंदुस्थानात पुढील वर्षी खेळवण्यात येणाऱ्या अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषकाच्या यजमानपदाची तयारी जोरात सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून आता हिंदुस्थानचा अंडर-17 महिला फुटबॉल संघ स्वीडन आणि थायलंडच्या बलाढय़ संघांविरुद्ध आंतरराष्ट्रीय लढतीत झुंजणार आहे. या संघांतील चार लढतींसाठी अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुल स्टेडियम म्हणजेच मुंबई फुटबॉल एरेना सज्ज झाला आहे.

युरोपियन फुटबॉल संघटना आशियाई फुटबॉल परिषदेच्या सहकार्याने हि मुंबईतील आंतरराष्ट्रीय लढतीची मालिका आयोजित करणार आहे. पुढील वर्षीच्या अंडर -17 महिला विश्वचषकासाठीची संघबांधणी म्हणून हिंदुस्थानी संघासाठी हि मालिका आयोजित करण्यात आल्याची माहिती अखिल हिंदुस्थानी फ़ुटबाँल महासंघाचे सचिव कुशल दास यांनी दिली.

मुंबई फुटबॉल एरेनात खेळवल्या जाणाऱया या मालिकेतील लढती सायंकाळी 6 पासून प्रकाशझोतात खेळवल्या जाणार आहेत. अंतिम लढत सायंकाळी 5.30 वाजता सुरू होईल.या मालिकेत खेळणारा थायलंड हा आशियाई महिला संघही फुटबॉल विश्वचषकाच्या पात्रतेसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे ही स्पर्धा हिंदुस्थानी संघासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास हिंदुस्थानी फुटबॉल महासंघाने व्यक्त केला आहे.
स्पर्धेचा नियोजित कार्यक्रम
13 डिसेंबर शुक्रवार -हिंदुस्थान वि. स्वीडन
15 डिसेंबर रविवार – स्वीडन वि. थायलंड
17 डिसेंबर मंगळवार – थायलंड वि. हिंदुस्थान
19 डिसेंबर गुरुवार – अंतिम लढत-गटविजेता वि. गट उपविजेता

22 सदस्यीय हिंदुस्थानी महिला फुटबॉल संघ
गोलरक्षक – मंजू घोष (ओडिशा ) ,अंशिका आणि तनु (हरयाणा )
बचावपटू- पूर्णिमा कुमारी (झारखंड ),ज्योतीकुमारी (ओडिशा ),निर्मलादेवी (मणिपूर),शिलकीदेवी हेमाम(मणिपूर),कीर्तिनादेवी थाऊनऊजम (मणिपूर),निशा (हरयाणा ),अष्टम ओरॉन (झारखंड) मध्यरक्षक – मार्टिना थॉकचॉम (मणिपूर) ,प्रियान्गका देवी नावरेम(मणिपूर),बबीना देवी लिशम (मणिपूर) ,अमिषा बाक्सला (झारखंड) ,अवेका सिंग (दिल्ली ),किरण (हरयाणा ),डेझी क्रास्टो (गोवा),सुनीता मुंडा (झारखंड ),मारियाम्माल बालमुरूगन (तामीळनाडू ). फॉरवर्डस- सुमती कुमारी (झारखंड ),लिंडा कॉम सरतो (मणिपूर) सई संखे (महाराष्ट्र )

आपली प्रतिक्रिया द्या