फुटबॉल स्पर्धेमधून महिला सशक्तीकरणाचा संदेश

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हॅफले इंडिया आणि आयडब्ल्यूएफएच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मुंबईतील सेंट जोसेफ मैदानावर एकदिवसीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत 16 ते 32 वयोगटातील मुलींच्या हिंदुस्थानातील दहा संघांचा समावेश होता. या संघांची निवड फुटबॉलमधील स्वयंसेवी संस्थांमार्फत केली होती. प्रत्येक संघाने शिक्षण मुक्तता, हुंडाबळी, बेटी बचाओ यांसारख्या विविध सामाजिक विषमता रोखण्यासाठी प्रत्येक संघाने जनजागृती केली.

या महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता तुषार कपूरसह अभिनेता कुणाल कपूर, रिचा बहल, आधुना भाबनी, नंदिता शाह, भैरवी जयकिशन, अंकिता तन्ना, नितीशा गुरव ,सरिता परेरा आणि निशरीन पारीख यांसारखे अनेक सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. अंतिम सामना गीता चीता आणि अंबरनाथ युनायटेड यांच्यात खेळला गेला. गीता चीता 2 गोलांनी विजयी झाली.

आपली प्रतिक्रिया द्या