नवी मुंबईत फुटबॉलची किक, युवा खेळाडूंमध्ये लढतींचे आयोजन

29

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारामुळे मुंबईत फुटबॉलला सुवर्णझळाळी मिळू लागली आहे. हिंदुस्थानच्या फुटबॉल संघानेही आंतरराष्ट्रीय स्तरावर कात टाकलीय. फुटबॉल या खेळामध्ये भावी पिढी घडावी यासाठी पावले उचलली जात आहेत. दरम्यान, युरोपमधील प्रीमियर लीग व हिंदुस्थानातील आयएसएल यांच्या पुढाकाराने फुटबॉलच्या विकासासाठी एक उपक्रम राबवण्यात येणार असून त्यानुसार आर्सेनल, लिसेस्टर सिटी, मुंबई सिटी एफसी आणि रिलायन्स फाऊंडेशन यंग चॅम्प्स या चार संघांमध्ये ‘पीएल-आयएसएल युथ गेम्स’अंतर्गत लढती होणार आहेत. नवी मुंबईतील घणसोली येथे होणाऱया लढतींदरम्यान माजी खेळाडू लेस फर्डिनांड याचीही उपस्थिती असणार आहे.
4 ते 6 मार्चदरम्यान या लढती होतील.

… तर आयएसएलचे भवितव्यही धोक्यात
आय लीग फुटबॉल स्पर्धेकडे काणाडोळा केल्यास त्याचा मोठा फटका फुटबॉलला बसू शकतो. त्यामध्ये सहभागी होणाऱया क्लब्जसह आयएसएल या स्पर्धेचे भवितव्यही धोक्यात येऊ शकते, असा इशारा हिंदुस्थानी फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याने यावेळी अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनला दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या