फुटबॉलचा जादूगार!

एक छोटय़ा चनीचा खेळाडू दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देऊन फुटबॉलपटू झाला. त्याने आपल्या अफलातून खेळाने अवघ्या जगाला भुरळ घातली. उंची जरी 5 फुट 5 इंच असली तरी त्याची कीर्ती पुठल्याच फुटपट्टीत मोजता आली नाही. झोपडपट्टीमध्ये एका गरीब पुटुंबात जन्म आणि संघर्षानंतर मिळविलेले फुटबॉलमधील वैभव असा थक्क करणारा प्रवास. केवळ त्याच्या आणि त्याच्यासाठीच अनेक जण फुटबॉलकडे आकर्षित झाले. फुटबॉलमधील त्याचे स्थान ध्रुवताऱयाप्रमाणे अढळ आहे. ‘फुटबॉलचा जादूगार’, ‘फुटबॉलचा सम्राट’, ‘हॅण्ड ऑफ गॉड’ अशा नानाविध उपाध्यांनी ज्यांचा गौरव झाला ते अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांनी बुधवारी जगाचा निरोप घेतला. नव्या पिढीसाठी मेस्सी, रोनाल्डो व नेयमार हे स्टार फुटबॉलपटू असले तरी मॅराडोनाची सर त्यांना कधीच येणार नाही. त्यामुळे ‘झाले बहु, होतील बहु, पण या सम हाच’ हीच ओळ दिवंगत मॅराडोनासाठी चपलख बसते.

लहरी अन् बिनधास्त

गेल्या 30 ऑक्टोबरला वयाचा हिरक महोत्सव (60 वर्षे) साजरा करणारे दिएगो मॅराडोना 25 नोव्हेंबरला इहलोकीच्या यात्रेवर निघून गेले. ऐन उमेदीच्या काळात ड्रग्ज आणि अल्कोहोलच्या आहारी गेल्यामुळे वयाच्या 60 व्या वर्षी या फुटबॉलच्या लिजंडची एक्झिट झाली. आपल्या ‘हॅण्ड ऑफ गॉड’ गोलमुळे गाजलेल्या 1986 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत मॅराडोनाने अर्जेंटिनाला जगज्जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली होती.

क्लब फुटबॉलची सुरुवात

ब्युनस आयर्स येथील एका झोपडपट्टीत एका गरीब पुटुंबात दिएगो मॅराडोनाचा जन्म झाला होता. आठ बहीण-भावांचा त्यांचा परिवार होता. तिसऱया वाढदिवसाला मॅराडोनाला भावाने एक फुटबॉल गिफ्ट दिला होता. तेव्हापासून फुटबॉलच्या प्रेमात पडलेले मॅराडोना चक्क सहा महिने तो फुटबॉल कोणी घेऊ नये म्हणून शर्टात घालून झोपत होते. वयाच्या दहाव्या वर्षी एस्ट्रेला क्लबकडून मॅराडोना यांनी खेळायला सुरुवात केली, तर 15व्या वर्षी अर्टेंटिनोस ज्युनियर्सकडून त्याच्या व्यावसायिक कारकीर्दीला सुरुवात झाली. 1978 च्या वर्ल्ड कपमध्ये केवळ लहान असल्याने मॅराडोनाला अर्जेंटिनाच्या संघात संधी मिळाली नाही. अखेर 1982 मध्ये तो पहिला वर्ल्ड कप खेळला.

व्यसनाने कारकीर्द संपवली

सोनेरी कारकीर्द सुरू असतानाच 1982 मध्येच मॅराडोनाने कोकेन घ्यायला सुरुवात केली. तो सातत्याने ड्रग्स आणि दारूच्या नशेत असायचा. याच कारणामुळे त्याच्या नेपोली क्लबने मॅराडोनावर 15 महिन्यांची बंदी घातली. कोकेन बाळगल्याप्रकरणी 14 महिन्यांची शिक्षाही झाली. ड्रग्सने मॅराडोनाची फुटबॉल कारकीर्द संपली अन् 1997 मध्ये त्याने फुटबॉलला गुडबाय केला.

आपली प्रतिक्रिया द्या