प्रेक्षकांच्या उपस्थितीत युरोपमध्ये फुटबॉलची किक

फ्रान्समध्ये रविवारी मध्यरात्री झालेल्या प्रदर्शनीय फुटबॉल लढतीला तब्बल पाच हजार फुटबॉलप्रेमींची उपस्थिती होती. कोरोनानंतर युरोपमध्ये फुटबॉलला सुरुवात झाली होती, पण पहिल्यांदाच प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली. या लढतीला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून फ्रान्समधील क्रीडा मंत्री रोक्साना मरासीनिनू यांनी हा तर फ्रान्स फुटबॉलचा विजय असल्याचे म्हटले आहे.

पॅरिस सेण्ट जर्मेन व ली हावरे यांच्यामध्ये झालेल्या लढतीत नेयमार, किलियन एमबापे यांसारख्या स्टार फुटबॉलपटूंचा समावेश होता. त्यांनीही आपल्या खेळाचा नजराणा पेश केला. ही लढत पॅरिस सेण्ट जर्मेन संघाने 9-0 अशा फरकाने जिंकली, पण प्रेक्षकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादासाठी ही लढत ओळखली गेली. या लढतीसाठी 30 व 60 युरो असे तिकीट रेट ठेवण्यात आले होते. अवघ्या सहा मिनिटांमध्ये पाच हजार तिकिटे विकली गेली हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या