… आणि फुटबॉल इतकं प्रसरण पावलं त्याचं गुप्तांग

अनेक आजार दुर्मिळ अशा प्रकारात मोडतात. ज्याची लागण होण्याचे प्रमाण कोट्यावधींमध्ये एकाला किंवा दोघांनाच असतं. असाच काहीसा आजार अमेरिकेतील एका व्यक्तीला झाला होता व त्या आजारामुळे त्याचे गुप्तांग चक्क फुटबॉल इतकं मोठं झालं होतं.

आजतक या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे. पनामा शहरात राहणाऱ्या या व्यक्तीला अचानक एके दिवशी गुप्तांगाजवळ त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळाने त्याच्या गुप्तांगाला सूज आल्यासारखी झाली. त्याला आधी वाटले की काही दिवसात होईल बरे पण हळू हळू त्याच्या गुप्तांगाचा आकार वाढत चालला होता. अवघ्या आठवड्याभरात त्याचे गुप्तांग फुटबॉलच्या बॉल इतके मोठे व गुडघ्यापर्यंत लांब वाढले होते. त्यामुळे त्याला घराबाहेर जाणे देखील लाजिरवाणे तसेच त्रासदायक झालेले. मात्र त्याच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टर देखील त्याचे गुप्तांग पाहून हादरून गेले. त्याच्या काही चाचण्या केल्या असता त्याला गँगरिन नावाचा आजार झाल्याचे समजले. त्या आजरामुळे त्याच्या गुप्तांगावर मांस वाढत चालले होते. ते मांस सडत देखील होते त्यामुळे त्याला प्रचंड वेदना व्हायच्या. अखेर डॉक्टरांनी त्याच्यावर तब्बल तीन वेळा शस्त्रक्रिया करून त्याच्या गुप्तांगावर वाढलेले सडके मांस काढून टाकले.

आपली प्रतिक्रिया द्या