क्रूर! पैसे मिळवण्यासाठी आजी-आजोबांना दिले जाते वाघांच्या तोंडी

28

सामना ऑनलाईन । पीलीभीत

पीलीभीत टायगर रिझर्व्ह झोनमध्ये सध्या अत्यंत क्रूर असे चित्र समोर आले आहे. वाघांनी शिकारकरावी यासाठी घरातील वृद्ध मंडळींना जंगलात सोडले जाते, असा संशय वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ही माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या ‘एजन्सी वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो’चे (WCCB) अधिकारी कलीम अतहर यांनी आपला तपास अहवाल सरकारकडे दिला आहे. त्यामध्ये वाघांकडून शिकारी व्हावी म्हणून घरातील वृद्धांचा वापर केला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच त्याची कारणं देखील या अहवालात नमूद केली आहेत.

‘व्याघ्र संरक्षण प्रकल्प’ क्षेत्रात कुणावर वाघाने हल्ला करून शिकार केली तर सरकारकडून त्याच्या कुटुंबीयांना मदत मिळते. ही मदत मिळवण्यासाठी परिसरातील गरीब कुटुंब आपल्या घरातील वृद्धांना जंगलात सोडून देता. मग वाघ त्यांची शिकार करतात. त्यानंतर त्याचे मृतदेह या परिसरात सापडतात. मग त्या मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदत मिळते. ही मदत मिळवण्यासाठी असे प्रकार सुरू असल्याचा संशय या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०१६ पासून आतापर्यंत अशा सात घटना समोर आल्या आहेत. एका परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्यानेही तशी माहिती दिल्याचे या वृत्तात म्हटले आहे. आपल्या कुटुंबातील गरीबी आपल्या जाण्याने कमी होत असेल तर काय वाईट आहे, असा विचार करून घरातील वृद्ध देखील वाघाची शिकार होण्यास तयार होतात, अशी धक्कादायक माहिती या शेतकऱ्याने दिली आहे. तसेच हा प्रकार अनेक वर्षांपासून असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या