
रात्री झोपताना दक्षिण दिशेकडे डोके ठेवून झोपावे. उत्तरेकडे डोके करून झोपू नये. यामुळे अनिद्रेची शक्यता असते. पचनशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो.
घराचे प्रवेशद्वार स्वच्छ असावे. यामुळे घरात लक्ष्मीदेवीचे आगमन होते.
विवाह पत्रिका फाडू नका. कारण यामुळे पत्रिका फाडणाऱ्या व्यक्तीला मंगळ किंवा ग्रहदोष लागतो.
पक्ष्यांना दाणे आणि गाईला चारा किंवा भाकरी खाऊ घातल्याने ग्रहदोषाचे निवारण होते.
कार्यालयात काम करताना उत्तर-पूर्व दिशेकडे तोंड करून बसणे शुभ असते. शिवाय कार्यालय प्रमुखाची केबिन नैऋत्य कोनात असायला हवी.
प्रवेशद्वारावर कधी अविचाराने गणपतीचे छायाचित्र लावू नका. दक्षिण किंवा उत्तरमुखी प्रवेशद्वारावरच गणपतीचे चित्र लावा.
घराबाहेर पडताना आई-वडिलांना नमस्कार करा. न सुटणारी कामेही सोपी होत जातात.
घरात शंख अवश्य ठेवा. शंख वाजवल्याने ५०० मीटर अंतरावरील रोगजंतू नष्ट होतात.
शयनकक्षात दूरध्वनी ठेवू नका. यामुळे शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम होतो.
देवघरात देवीदेवतांची जास्त चित्रे ठेवू नका. तसे करणे आरोग्यासाठीही चांगले नाही. शिवाय शयनकक्षातही देवांचे जास्त फोटो ठेवू नका.