तूर खरेदीसाठी ठिय्या आंदोलन

14

सामना ऑनलाईन, रावेर

शासनाने तूर खरेदी त्वरित सुरू करावी यासह विविध मागण्यांसाठी आज तालुका काँग्रेसतर्फे येथील तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

तालुका काँग्रेस अध्यक्ष अर्जुन जाधव, सरचिटणीस रामदास लहासे,जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष राजू सकर्णे, अॅड. एम.ए.खान व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसीलदार कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. ’तूर खरेदी त्वरित सुरू झालीच पाहिजे’ ’शेतक-यांना कर्ज माफी मिळालीच पाहिजे’ आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या वेळी नायब तहसीलदार कविता देशमुख यांना या निवेदन देण्यात आले. २२ एप्रिलपासून तूर खरेदी केंद्र बंद आहे. या मुळे शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर पडून आहे यासाठी तूर खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, तूर खरेदीच्या निर्णयातील जाचक अटी रद्द कराव्यात, शेवटच्या दाण्यापर्यंत शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करावी यासह विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर ज्ञानेश्वर महाजन पंकज वाघ, दिलरुबाब तडवी, गयासोद्दीन काझी, गफूर तडवी, मधुकर पाटील, महेंद्र पाटील, जफरुल्ला जमादार, रामसिंग चव्हाण, संजय चौधरी, महेद्र गजरे, संतोष पाटील, शेख अहमद, रमजान तडवी, देवीदास महाजन याच्या सह्या आहेत. यावेळी तालुका काँगेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या