‘नीट’ परीक्षेसाठी प्रथमच दुबईतही परीक्षा केंद्र

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसाठी (नीट) यंदा पहिल्यांदाच दुबई येथेही परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहे. मध्य-पूर्व आशियातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) हा निर्णय घेतला आहे. या वर्षी पहिल्यांदाच कुवैतमध्येही परीक्षा घेतली जाणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. ‘नीट’ परीक्षा यंदा 198 शहरांमध्ये घेण्यात येणार आहे. सुरुवातीला 155 शहरांची निवड झाली होती, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियमांचे काटेकोर पालन करता यावे म्हणून त्यात वाढ करण्यात आली. परीक्षा केंद्रेही वाढवून 3862 इतकी करण्यात आली आहेत. या वर्षी ‘नीट’ परीक्षा मराठी, हिंदी, इंग्रजीसह 13 भाषांमध्ये घेण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या