फोर्ब्जच्या यादीत अक्षय कुमार! टॉप 10 मध्ये बॉलीवूडचा एकमेव सेलिब्रिटी

1127

सर्वाधिक मानधन घेणाऱया जगभरातील टॉप-10 कलाकारांची यादी फोर्ब्जने नुकतीच जाहीर केली आहे. या यादीत सलमान खान, शाहरूख खान यांना मागे टाकत बॉलीवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारने बाजी मारली आहे. या यादीत तो सहाव्या क्रमांकावर असून त्याची वर्षभरातील कमाई 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रुपये आहे. महत्त्वाचे म्हणजे या यादीत स्थान मिळवणारा तो एकमेक बॉलीवूड सेलिब्रिटी ठरला आहे.

1 जून 2019 ते 1 जून 2020 या कालावधीतली अक्षयची ही कमाई आहे. चित्रपटांपेक्षा जाहिरातींच्या माध्यमातून अक्षयने बक्कळ कमाई केली आहे. या यादीत ‘द रॉक’ म्हणून ओळखला जाणारा हॉलीवूड अभिनेता ड्केन जॉनसन पहिल्या क्रमांकावर असून या कालावधीतली त्याची कमाई 87.5 मिलियन डॉलर आहे. रेड नोटीसमधील त्याचा सहकलाकार रयान रेनॉल्ड्स हा या यादीत दुसऱया क्रमांकावर असून त्याची वर्षभरातील कमाई 71.5 मिलियन डॉलर आहे. 58 मिलियन डॉलरची घसघशीत कमाई करून मार्क व्हालबर्ग तिसऱया क्रमांकावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या