शेअर मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चढ-उतार पाहायला मिळत आहे. हिंदुस्थानी शेअर बाजार कधी घसरतोय, तर कधी मोठी उसळी घेत आहे. परंतु गेल्या सात दिवसांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी हिंदुस्थानी इक्विटी बाजारातून तब्बल 13 हजार 400 कोटी रुपये काढून घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन महिन्यांत हिंदुस्थानी बाजारात गुंतवणूक करणाऱया विदेशी पोर्टपहलियो गुंतवणूकदारांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे.
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, या वर्षी आतापर्यंत एफपीआयने हिंदुस्थानी इक्विटी बाजारातून 22 हजार 134 कोटी रुपये काढून घेतले आहेत. यामुळे विदेशी गुंतवणूकदारांच्या मनात नेमके दडलंय काय? असा सवाल आता शेअर बाजारात उपस्थित केला जात आहे. अमेरिकेवर मंदीचे सावट आहे हे एक कारण याच्या मागे सांगितले जात आहे.