परदेशवारी करून आलेल्या लोकांची माहिती गोळा करा,पुणे, कोल्हापुरातील शिक्षकांना आरोग्य विभागाचे फर्मान

कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुट्टी द्यावी किंवा वर्क फ्रॉम होमची मुभा मिळण्याची मागणी करणाऱ्या शिक्षकांना घरोघरी जाऊन मागील महिनाभरात परदेशवारी करून आलेल्या लोकांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आले आहे. पुणे महापालिका आरोग्य विभागाने कोरोना सर्वेक्षणाचे आदेश दिले असून कोल्हापूर जिह्यातील शिक्षकांनाही परदेशवारी करणाऱ्या लोकांची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना कोरोना जनजागृती आणि सर्व्हे करण्याच्या आरोग्य विभागाच्या आदेशाविरोधात शिक्षक समन्वय समितीने शिक्षण समिती सभापती आणि शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. सुरक्षेच्या दृष्टीने शिक्षकांना या सर्वेक्षणाचे प्रशिक्षण दिलेले नाही तसेच सर्वेक्षण करताना काळजी घ्यावयाची साधनेही शिक्षकांना दिलेली नाहीत. अशा परिस्थितीत हे सर्वेक्षण करणे म्हणजे शिक्षकांच्या जिवाशी खेळ आहे. त्यामुळे एकही शिक्षक हे सर्वेक्षणाचे काम करणार नाही, असा निर्णय समन्वय समितीचे मोहन भोसले (मामा), अध्यक्ष संभाजी बापट, मार्गदर्शक राजाराम करूटे, प्रसाद पाटील, जयवंत पाटील, नामदेव रेपे, राजमोहन पाटील यांनी घेतला आहे.

सर्वेक्षणाची कोणतीही सूचना नाही

जिल्हा प्रशासनाने शिक्षकांनी सर्केक्षण कराके अशी कोणतीही सूचना दिली नाही. तसेच शिक्षकांना सुट्टी देण्यासंदर्भात किंवा वर्क फ्रॉम होम करण्याविषयी अद्याप निर्णय झालेला नसल्याचेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या