सुशांतने गळफासासाठी वापरलेल्या कापडाची वजन पेलण्याची चाचणी होणार

786

बॉलिवूडचा उदयोन्मुख स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या कारणांचा छडा लावण्याचा तपास आता त्याने गळफास घेण्यासाठी वापरलेल्या त्याच्या नाइट गाऊनच्या कापडाची चाचणी घेण्यापर्यंत आला आहे. तसेच त्याच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीच्या अहवालाचीही तपास अधिकारी वाट पाहात

सुशांत सिंग राजपूत याने 14 जून रोजी वांद्रे येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याने हिरव्या रंगाचा नाइट गाऊन गळ्याभोवती गुंडाळत तो छताला लटकवून आत्महत्या केली होती. तसेच घटनास्थळी कोणतीही चिठ्ठीही सापडली नसल्याचे पोलीसांनी म्हटले होते. हा गाऊन कॉटनचा असून त्या कापडाची सुशांतचे वजन खरेच पेलण्याची क्षमता होती का? हे कापड 80 किलोचे वजन पेलण्यासाठी सक्षम होते का? यासाठी ही ‘टेन्सील स्ट्रेन्थ’ केली जाणार आहे. टेन्सील स्ट्रेन्थ म्हणजे कापडाची वजन पेलण्याची कमाल क्षमता पाहिली जाते. कमाल क्षमतेनंतर कोणत्याही कपडय़ाला चिरा पडून ते फाटते. या टेस्टद्वारे या घटनेमागे खराच काही संशयास्पद प्रकार आहे का याचा उलगडा होण्यास मदत मिळणार आहे. तसेच मोबाईल फोनचा फॉरेन्सिक अहवालही लवकरच मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

अनेक नावे पुढे आली आहेत
अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी वेगवेगळेआरोप आणि तक्रारी यासंदर्भात आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आमच्याकडे व्यावसायिक दुश्मनीतून त्यानं आत्महत्या केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्या पद्धतीनं पोलीस खातं तपास करत आहे. अनेकांचे स्टेटमेंट घेण्यात आले आहेत. अनेक नावं समोर आली आहेत. ज्यांचा तपास करणं अतिशय गरजेचं आहे. त्यांची चौकशी केली जाईल. त्याने खरंच व्यावसायिक दुश्मनीतून आत्महत्या केली का? याची चौकशी सुरू आहे. जोपर्यंत संपूर्ण तपास होत नाही, तोपर्यंत सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या