स्टीव्ह वॉच्या हाती मित्राच्या अस्थी, श्रद्धापूर्वक गंगेत केल्या विसर्जित

9
फोटो- पीटीआय

सामना ऑनलाईन । वाराणसी

स्टीव्ह वॉ म्हटल्यावर समोर येतो तो थंड डोक्याने समोरच्या संघावर मात करणारा ऑस्ट्रेलियाचा आक्रमक माजी कर्णधार, मात्र आज तो एका वेगळ्याच स्वरुपात दिसला. आपल्या मित्राची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी तो हिंदुस्थानात आला होता. निधनानंतर आपल्या अस्थी गंगेत विसर्जित कराव्या अशी स्टीव्ह वॉच्या मित्राची इच्छा होती आणि त्याने ती अत्यंत श्रद्धेने पूर्ण केली.

स्टीफन हा स्टीव्ह वॉचा अगदी जीवलग मित्र. त्याच्यासाठी तो वाराणसीत आला होता. स्टीव्हने पूर्णपणे हिंदू पद्धतीने स्टीफनच्या अस्थी गंगेच्या मनकर्णिका घाटावर विसर्जित केल्या. या घाटापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इतर माहितीसाठी त्याने एक गाईडही सोबत घेतला होता.

‘स्टीफन माझा अत्यंत जवळचा मित्र होता. तो कृष्णभक्त होता आणि इस्कॉन मंदिराशीही संबधित होता. आपल्या मृत्युनंतर आपल्या अस्थींचे गंगाघाटावर विसर्जन व्हावे अशी त्याची शेवटची इच्छा होती. ती मला पूर्ण करता आल्याने मला खूप समाधान वाटत आहे’, अशी प्रतिक्रिया स्टीव्हने प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या स्टीव्ह वॉची वेगळी ओळख यानिमित्ताने हिंदुस्तानींना आणि त्याच्या तमाम चाहत्यांना झाली.

आपली प्रतिक्रिया द्या