‘आयटम’वरून मध्य प्रदेशचे राजकारण तापले, राहुल गांधींच्या नाराजीनंतरही कमलनाथ ठाम

rahul-gandhi-kamalnath

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या उमेदवार इमरती देवी यांना ‘आयटम’ संबोधनल्याने सुरु झालेल्या राजकीय वाद आता आणखीन तापू लागला आहे.

याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कमलनाथ यांना फटकारले आहे. अशी भाषा चालणार नाही, अशा शब्दात त्यांचे कान टोचले खरे. पण त्यानंतरही कमलनाथ मात्र आपल्या वकत्व्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी येथील एका सभेत शिवराज चौहान यांच्या कॅबेनिट मंत्री इमरती देवी यांना ’आयटम’ म्हणून संबोधले होते. यावरुन सध्या मध्य प्रदेशातील राजकारण तापले आहे. याप्रकरणी कमलनाथ यांना राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस देखील बजावली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना याप्रश्नी मौन सोडत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी म्हणाले की, कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचे आहेत, मात्र अशा प्रकारची भाषा योग्य नाही. पुठल्याही नेत्याला अशी भाषा वापरणं हे चांगले नाही. मला अशी भाषा वापरणे हे मुळीच आवडलेलं नाही. मग तो कोणीही असो, असे वक्तव्य करणे, हे दुर्दैवी असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

यासंदर्भात कमलनाथ म्हणाले की, ते राहुलजींचे मत आहे. मी तो शब्द कोणत्या संदर्भात वापरला ते मी अगोदरच स्पष्ट केले आहे. याप्रकरणी आणखीन काही बोलायची गरज नाही. मी माफी का मागू? कोणाला अपमानित करणे हा माझा हेतू नव्हता. जर कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर मी दिलगीरी व्यक्त करत असल्याचे मी अगोदरच स्पष्ट केले आहे.

शिवराज सिंह यांनी जनतेच्या समोर यावे आणि त्यांनी माफी मागावी, मी याप्रकरणी याअगोदरच खेद जाहीर केला असल्याचे कमलनाथ यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या