माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

1049

राज्याचे माजी पोलीस महासंचालक, ज्येष्ठ आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार यांचे शुक्रवारी पहाटे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी हरकिसनदास रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इनामदार यांच्या निधनाने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

प्रकृती ठीक नसल्यामुळे अरविंद इनामदार यांना हरकिसनदास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. कर्तव्यदक्ष, झुंजार, चतुरस्र, उत्तम प्रशासक, वक्ते, संवेदनशील व विद्वान असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. पोलीस ठाणी महिलांना माहेरघर वाटावे अशी त्यांची भावना होती. सामान्य नागरिकांप्रमाणे महिलांना न्याय मिळवून देण्यात इनामदार यांचे मोठे योगदान होते. महासंचालक असताना त्यांनी कणखर भूमिका घेत पोलीस कर्मचाऱयांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले होते. पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजसेवेचे क्रत सोडले नाही. अरविंद इनामदार फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱया अंमलदारापासून आयपीएस अधिकाऱयापर्यंत सर्वांचा ते यथोचित सत्कार करून पोलिसांना प्रोत्साहन देण्याचे काम करीत होते. इनामदार यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या