मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर झाला कोच

1107

मास्टर ब्लास्टर हिंदुस्थानचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला काही दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीतील पीडितांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी एका सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात सचिन तेंडुलकर एक नवी भूमिका करताना दिसणार आहे.

क्रिकेट डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागलेल्या आगीतील पीडितांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी बुशफायर सामना खेळण्यात येणार आहे. या होणाऱ्या सामन्यात एका संघाचा कर्णधार रिकी पॉटिंग आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार शेन वॉर्न असणार आहे. तर या सामन्यातील रिकी पॉटिंगच्या संघाचा कोच हा सचिन तेंडुलकर असणार आहे. तर दुसऱ्या संघाचा कोच हा वेस्टइंडिज संघाचा वेगवान गोलंदाज कॉर्टनी वॉल्श असणार आहे. या सामन्यात वसिम अक्रम, युवराज सिंग यांच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज जस्टिन लेंगर आणि मैथ्यू हेडन या खेळाडूंचाही सामावेश असणार आहे.

या होणाऱ्या सामन्याला ऑल-स्टार टी-20 हे नाव देण्यात आले आहे. तर सामन्याच्या माध्यमातून जमा झालेला आर्थिक निधी हा ऑस्ट्रेलियाच्या रेडक्रॉस आपात्कालिन सहाय्यता निधीला देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या