राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या; पुण्यातील नाना पेठेत थरार; गोळ्या झाडून कोयत्याने वार

ऐन वर्दळ असलेल्या नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा दोन ते तीन जणांनी पिस्तुलातून चार ते पाच गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. रविवारी रात्री नाना पेठेत घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घरगुती वादातून बंडू आंदेकर यांचा जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गणेश लक्ष्मण कोमकर आणि  सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)