राष्ट्रवादीचे माजी खासदार माजिद मेमन यांनी दिला पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; जाणून घ्या कारण

Majeed-Memon

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी गुरुवारी पक्ष सदस्यत्वाचा दिला राजीनामा आहे. आपण वैयक्तीक कारणामुळे पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील माझ्या 16 वर्षांच्या कारकीर्दित मला सन्मान आणि अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मी आभार मानतो. वैयक्तिक कारणास्तव मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्यत्व सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षाला माझ्या सदैव शुभेच्छा, असे मेमन म्हणाले.