देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दीर्घ आजाराने गुरूवारी 26 डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांच्यावर 28 डिसेंबर रोजी दिल्लीतील निगमबोध घाट येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस आणि इतर पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते.