शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे निधन

विले पार्ले येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. शिवसेनेकडून दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या पाटकर यांच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

शशिकांत पाटकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. शशिकांत पाटकर यांना शुक्रवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास अत्यवस्थ वाटू लागल्याने विले पार्लेच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर तातडीने तपासणी करून उपचारही सुरू करण्यात आले. मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे.

विले पार्लेतील लोकप्रिय नेतृत्व

विले पार्ले-अंधेरी वॉर्ड क्र. 84 मधून शशिकांत पाटकर हे शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात विभागात अनेक विकासकामे केली. नगरसेवक होण्याआधी शिवसेना शाखाप्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. विले पार्लेतील शिवसेनेचे लोकप्रिय नेतृत्व म्हणून ते परिचित होते. शशिकांत पाटकर यांच्या पत्नी यादेखील शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या