‘वजनदार’ इमानचा मृत्यू

24

सामना प्रतिनिधी, अबुधाबी

तब्बल ५०४ किलो वजन असलेली जगातील सर्वांत ‘वजनदार’ महिला इमान अहमदचा अबुधाबी येथील बुर्जिल रुग्णालयात आज पहाटे ४.३० वाजता मृत्यू झाला. हृदयविकार, मूत्रपिंड निकामीसह अनेक व्याधींनी इमान हिला ग्रासले होते.

मूळची इजिप्तची असलेली इमान अहमदचा गेल्याच आठवड्यात ३७ वा वाढदिवस झाला होता. एलिफेंटायसिस हा अजार लहानपणीच झाल्यामुळे तिचे वजन वाढत गेले. ५०० किलोंपेक्षा जास्त वजन झाले. त्यामुळे इमान अहमदला मधुमेह, रक्तदाब, मेंदूविकार, हृदयविकार अशा आजारांनी ग्रासले होते. तिला हालचालही करता येत नव्हती.

३०० किलो वजन घटवले
गेल्या वर्षी मुंबईतील सैफी हॉस्पिटलमध्ये डॉ. मुफ्फजल लकडावाला आणि त्यांच्या टीमने इनामवर उपचार केले. तिचे वजन तब्बल ३०० किलो कमी करण्यास डॉक्टरांना यश आले. मुंबईतून जाताना इमानचे वजन १६९ किलो होते. पण अबुधाबीतील बुर्जिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना इमानचा मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या