190 कोटी वर्षांपूर्वीचा पोपट आडदांड कुत्र्याएवढ्या होता, शोधकर्तेही हैराण

1662

सामना ऑनलाईन, ऑकलंड

न्यूझीलंडमधल्या संशोधकांना आडदांड कुत्र्याच्या उंचीच्या पोपटाचा सांगाडा सापडला आहे. पोपटाचा हा आकार पाहून संशोधकही हैराण झाले आहे. या पोपटाची उंची 3 फुटापर्यंत असावी आणि वजन जवळपास 7 किलोपर्यंत असावं असा अंदाज आहे. हा पोपट 190 कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होता असं संशोधकांचं म्हणणं आहे. याआधी काकापो जातीचा पोपट हा सगळ्यात मोठा होता असा दावा करण्यात आला होता, मात्र न्यूझीलंडच्या संशोधकांनी दावा केलेला पोपट हा त्याहीपेक्षा मोठा आहे.

हा भलामोठा पोपट त्याच्या आकारामुळे उडू शकत नसावा असं संशोधकांचं म्हणणं आहे. या पोपटाची हाडे 11 वर्षांपूर्वी सापडली होती. त्यावेळेला ती ससाण्याची किंवा बदकाची असावीत असं वाटलं होतं. मात्र अपघाताने ही हाडं संशोधक ट्रेव्हर वर्दी यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी यावर केलेल्या संशोधनातून ही हाडं पोपटाची असल्याचं सिद्ध झालं. हा पोपट शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता आणि गरज पडल्यास तो इतर पोपटांनाही खात होता असंही संशोधकांनी सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या