
ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना गेल्या 24 तासांत चार जवान शहीद झाले. आरएस पुरा परिसरात पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात 25 वर्षीय रायफलमॅन सुनील कुमार, कृष्णा घाडी सेक्टरमध्ये लष्कराच्या चौकीजवळ पाकिस्तानी सैन्याने डागलेल्या तोफगोळ्यात हिमाचल प्रदेशचे जेसीओ सुबेदार मेजर पवन कुमार, आणखी एका घटनेत हवाई दलाचे सार्जेंट सुरेंद्र कुमार मोगा आणि एलओसीजवळ बीएसएफचे जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले. पाकिस्तानच्या गोळीबारात पूंछमध्ये एकाच कुटुंबातील 14 वर्षीय झोया खान आणि तिचा भाऊ 12 वर्षीय झैन खान यांचा मृत्यू झाला. तर अयान खान आणि अरुबा खान या भावंडांचेही प्राण गेले.